राजकीयरत्नागिरी मनसे मध्ये इनकमिंग चा धडाका सुरूच.अनेक महिलांनी केला मनसे मध्ये जाहीर...

रत्नागिरी मनसे मध्ये इनकमिंग चा धडाका सुरूच.अनेक महिलांनी केला मनसे मध्ये जाहीर प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांच्या मार्गदर्शनखाली महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली महिला शहर सचिव संपदा राणा यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी शहरातील अनेक महिलांनी मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे..
गेल्या काही दिवसापासून मनसे ने रत्नागिरी शहरातील अनेक गोष्टी वर आवाज उठवला होता. अनेक यशस्वी आंदोलने केली होती त्या गोष्टीनी भारवून यां महिलांनी मनसे प्रवेश केला असे सांगण्यात आले
आगामी काळात मनसेचे इंजिन असेच रत्नागिरी शहरात सुसाट धावेल अजूनही काही पक्ष प्रवेश होणार आहेत असे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी सांगितले आहे. याप्रसंगी उप जिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे महिला शहर सचिव संपदा राणा कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...