भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, कोरडं हवामान असणार आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे..
