ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगांना मदत व मार्गदर्शन करणे, रोजगार निर्मिती करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम, तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा, विपणन आणि बाजारपेठ प्रवेश, पायाभूत सुविधा निर्माण करणे व उद्योग क्षेत्रात प्रगती साधण्यास मदत करणे ही कामे यामार्फत केली जातात, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला व तातडीने सर्व कामासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.