राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत ह्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या मूळगावी जाऊन त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. ज्यांनी आपल्या विकासाभिमुख, सुधारक नेतृत्वाने भुरळ घातली त्या भारतीय घटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्याने त्यांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार राज्यकारभार करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते व त्यांच्या विचारावर चालण्याची एक नवी ऊर्जा मला मिळते, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित देशाला राज्यघटना देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचतीर्थ म्हणून घोषित झालेले मूळगाव आंबवडे या ठिकाणी आज असंख्य अनुयायी अभिवादन करण्यासाठी आलेले होते. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी काही अनुयायांशी संवाद साधला व या पवित्र दिनी सर्वांनाच शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी राज्यमंत्री योगेशजी कदम, असंख्य अनुयायी, महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
