चिपळूणचिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन राज्याचे...

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे वस्तूसंग्रहालय हे चिपळूणच नाही तर रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्वाचा ठेवा आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या वस्तूसंग्रहालयासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने सर्वांच्या वतीने ना. उदय सामंत ह्यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.

हे वस्तूसंग्रहालय 36 वर्षांपूर्वी चिपळूण येथे उभारण्यात माजी आमदार रमेश कदम यांचे योगदान सर्वात मोठे असल्याचे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी नमूद केले. मला पहिल्यांदा पालकमंत्री करण्यासाठी आग्रही मागणी चिपळूण येथून झाल्याची आठवण यावेळी यानिमित्ताने आली आणि यामध्ये माजी आमदार रमेशभाई कदम यांचा महत्वाचा वाटा होता, रमेशभाईंच्या कार्याला यानिमित्ताने ना. उदय सामंत ह्यांनी उजाळा दिला व त्यांचे सामाजिक व राजकीय जीवनातील योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे विचार यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केले.

चिपळूणच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून सर्वोतपरी योगदान देण्याचे कार्य भविष्यात केले जाईल असा शब्द यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी दिला. तसेच चिपळूण नगरपालिकेला 150 वर्ष पूर्ण होत असताना नगरपालिकेची अतिशय भव्य इमारत उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी दिला.

यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार श्री.रमेश कदम, संस्थेचे अध्यक्ष डॉ.यतीन जाधव, श्री.प्रकाश देशपांडे, श्री.धनंजय चितळे, श्री.विशाल भोसले, डॉ.श्रीधर ठाकूर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

Breaking News

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी

रत्नागिरी,  : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६...

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्याशिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

मुंबई, : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना...