रत्नागिरीखरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या भावनेने रत्नागिरी येथे काम...

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या भावनेने रत्नागिरी येथे काम करणाऱ्या जैन समाजातील प्रमुख मंडळींनी रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या एस टी स्टॅन्ड वरप्रवाशांना व नागरिकांना पुन्हा स्वछ पाणी उपलब्ध करून देण्याचे पुण्यांचे काम केले असल्याने पालक मंत्री डॉ उदय सामंत. फलोद्यान व रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भारतीय जैन संघटनेचे भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा ही दिल्या..

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या भावनेने रत्नागिरी येथे काम करणाऱ्या जैन समाजातील प्रमुख मंडळींनी रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या एस टी स्टॅन्ड वर
प्रवाशांना व नागरिकांना पुन्हा स्वछ पाणी उपलब्ध करून देण्याचे पुण्यांचे काम केले असल्याने पालक मंत्री डॉ उदय सामंत. फलोद्यान व रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भारतीय जैन संघटनेचे भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा ही दिल्या..
रत्नागिरी येथील
भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष दिलीप भंडारी यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी बस स्थानकावर पूर्वीपासून तयार करण्यात आलेल्या पाणपोई चे नूतनीकरण करून थोडे आधुनिक स्वरूप देण्यात येऊन तीचे नागरिकांसाठी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत लोकापर्ण करण्यात आले
जैन समाजाच्या वतीने प्रवासांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई बद्दल बोलताना उद्योजक सुरेश जैन यांनी सांगितले की 2006 पासून ही पाणपोई सुरू होती.
परंतु मध्यंतरी एस टी बस स्थानकाचे बांधकाम चालू असल्यामुळे ती बंद करण्यात आली होती परंतु आता ही पाणपोई नागरिकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली असून वॉटर प्युअर वरच्या मदतीने अत्यंत स्वच्छ चांगलं पाणी यावेळी नागरिकांना देण्यात येणार आहे.

त्याची देखभाल करण्यासाठी एक व्यक्ती तैनात करण्यात आली आहे
भारतीय जैन संघटनेतर्फे व रत्नागिरी जैन समाजाचा हाच उद्देश आहे की एसटी स्थानकावर येणारा किंवा बाहेरून येणारा जाणारा प्रत्येक गरीब नागरिकाला सुद्धा फुकट आणि स्वच्छ पाणी मिळावं हाच या मागचा उद्देश आहे
ही पाणपोई पिण्याच्या पाण्यासाठीच करा व इतर कुठल्याही गोष्टीसाठी करू नये आणि सगळ्यांनी याची स्वच्छता राखली पाहिजे हे आमच्या वतीने सर्व नागरिकांना नम्र विनंती असल्याचेही सुरेश जैन यांनी सांगितले. जैन समाज रत्नागिरी येथे उद्योगधंदा करीत सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते हे कोणीही नाकारू शकत नाही

Breaking News

पक्ष्यांपासून खूप काही शिकण्यासारखे

१. सुर्योदयापूर्वी व सुर्यास्तानतंर पक्षी काहीही खात नाहीत..२. पक्षी...