▪️मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल बोर्डाकडून आॕनलाईन जाहीर झाला असून त्यामध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संचलित, न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर, जि. रत्नागिरी दोन्ही माध्यमाच्या विद्यालयांचा निकाल 100% लागला असून त्यात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
💐 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळांनी उत्तम कामगिरी पार पाडल्याने सर्व वर्गातून अभिनंदन होत आहे..
▪️संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा ही संस्था नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सोई पुरविण्यासाठी प्रयत्नशील असते. परिसरातील लहान लहान गावातून येणाऱ्या सर्व स्तरातील मुलांना शिक्षण व्यवस्थेत सामावून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था 1940 पासून करत आहे. त्याचबरोबर व्यवसाय मार्गदर्शनाचे सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांचे भविष्यही सुरक्षित करण्यात संस्था मोलाचे योगदान देत आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी संस्था व शाळा नवनवीन उपक्रम राबवित आहे.
▪️विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करत शाळेपर्यंत पोहचावे लागते. घरात शैक्षणिक सुविधांचा अभाव असतानाही सेमी इंग्रजी निवडून प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
👉🏻 मराठी मध्यम एसएससी निकाल मार्च 2025
▪️परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी – 61
▪️उत्तीर्ण विद्यार्थी – 61
▪️शाळेचा निकाल – 100%
💐 आमचे गुणवंत विद्यार्थी
1️⃣ प्रथम- कु. सानवी सतीश पांचाळ – 92.00%
2️⃣ द्वितीय- कु. शिवानी उदय निंगावले-90.00%
3️⃣ तृतीय-कु. निकिता नवनाथ साळवी-86.40%
4️⃣ चतुर्थ – कु. श्रावणी राजेंद्र साळवी-86.00%
5️⃣ पाचवी – कु. तन्वी विनायक काष्टे – 85.20%
👉🏻 इंग्रजी मध्यम एसएससी निकाल मार्च 2025
▪️परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी – 50
▪️उत्तीर्ण विद्यार्थी – 50
▪️शाळेचा निकाल – 100%
💐 आमचे गुणवंत विद्यार्थी
1️⃣ प्रथम- कु. आरजू उस्मान मालगुंडकर- 87.80%
2️⃣ द्वितीय- कु. अस्मिना इरशाद जुवळे – 87.20%
3️⃣ तृतीय-कु. सफा अल्लाउद्दीन बोट -86.40%
4️⃣ चतुर्थ – कु. महक मुनाफ मुकादम -85.40%
5️⃣ पाचवी – कु. अदिबा आसिफ अलजी – 84.40%
▪️संस्थेचे उत्तम सहकार्य व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, प्राचार्या सौ. मणेर व श्रीमती जुवळे यांचे उत्तम नियोजन व प्रशासनाची उत्तम जाण, सर्व शिक्षकांचे सूक्ष्म अध्यापन, विद्यार्थ्यांचे अविरत कष्ट, नियमित जादा तासिकांचे आयोजन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, भरपूर सराव परीक्षा व पालकांचे सहकार्य या सर्व बाबींमुळेच हे यश मिळू शकले.
▪️सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, सचिव श्री. सईद उपाद्ये, सहसचिव श्री. शौकतअली खलफे, खजिनदार श्री. शुकूर गैबी, प्राचार्या सौ. एल. एन. मणेर, पर्यवेक्षक श्री. एस ए पटेल, इंग्रजी मध्यम मुख्याध्यापिका श्रीमती ए एम जुवळे, प्राथमिक विभाग मुख्याधपिका श्रीमती गुलशन बेग, दोन्ही माध्यमाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.
💐 *शाळेने एच एस सी व एस एस सी दोन्ही परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्यामुळे पंचक्रोशीत विविध स्तरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.