महाराष्ट्रराज्यात १८ लाख बोगस रेशन कार्ड रद्द ??

राज्यात १८ लाख बोगस रेशन कार्ड रद्द ??

मुंबई : राज्यात १८ लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. सरकारी नोकरदार, व्यापारी, श्रीमंतांकडून स्वस्त धान्याचा गैरवापर करण्यात येत असल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही बांगलादेशी नागरिकांनी काढलेले बोगस रेशनकार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यात राबवण्यात येणाऱ्या ई-केवायसी मोहिमेमुळे या अपात्र लाभार्थ्यांवर गंडांतर आले आहे. ५.२० कोटी रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, १.६५ कोटी कार्डधारकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ही मोहिम संपली असली, तरी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत केवायसी सुरू राहणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळतच राहणार आहे.
**

Breaking News