कोकणकोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत..

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत..

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली ते विलवडे दरम्यान ट्रॅक वर पडलेल्या दरडी मुळे मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.. कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने दरड हटवून मार्ग मोकळा केला असल्याने आता मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली असल्याचे सांगण्यात आले. अवकाळी पावसात दरड पडली.अजुन मुख्य पाऊस तर सुरू व्हायचा आहे..गेल्याच आठवड्यात चेअरमन सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी पावसाळ्या पूर्वीची कोकण रेल्वे मार्गाची पाहणी केली होती. आणी लगेचच दरड पडली असल्याने पाहणी वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे…

Breaking News