चिपळूणचिपळूण व गुहागर तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा...

चिपळूण व गुहागर तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

चिपळूण व गुहागर तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चिपळूण व गुहागर तालुक्यात पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या संभाव्य आपत्ती, विशेषतः पूरस्थिती व दरडग्रस्त भागांची तयारी, नियोजन व बचावकार्य यावर केंद्रित मान्सूनपूर्व आढावा मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत या बैठकीत घेण्यात आला.

🔹 प्रमुख निर्णय व उपाययोजना:

✅ पूरनियंत्रणासाठी नियोजनबद्ध उपाय – प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली १८ अधिकाऱ्यांमार्फत विविध टीमकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

✅ नालेसफाई व धरणांची तपासणी पूर्ण – संभाव्य धोक्याचा अंदाज घेत स्थलांतराची तयारी.

✅ २१ शेल्टर हाऊस – पूरस्थितीत नागरिकांसाठी सुरक्षित आश्रय. यासाठी २४८ कोटी रुपये शासनाकडून मंजूर.

✅ संवेदनशील गावांमध्ये विशेष उपाययोजना – दरडग्रस्त भाग, नदीकाठची गावे, वीज वितरण, ड्रेनेज यावर लक्ष.

✅ NDRF, SDRF व स्थानिक यंत्रणा सज्ज – संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी.

✅ बियाणे, खत, औषधे, पशुधन आश्रय – शेती व पशुधन रक्षणासाठी साठा तयार.

✅ पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश – शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाय.

✅ डोंगराळ भागातील संभाव्य दरडप्रवण ठिकाणांचा अहवाल तयार – संरक्षक जाळी व स्थलांतर यावर भर.

✅ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे ड्रेनेजवर परिणाम होऊ नये यासाठी सूचना.

✅ हवामान खात्याच्या व प्रशासनाच्या सूचना न चुकता पाळा

✅ नद्या, ओढ्यांच्या काठावर अनावश्यक वावर टाळा

✅ आरोग्य लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या

✅ गरज असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधा

📞 महत्वाचे हेल्पलाइन क्रमांक

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: १०७७

आरोग्य आपत्कालीन मदत: १०८

पोलीस मदत: १००

महावितरण हेल्पलाइन: १९१२

या बैठकीत आढाव्याबरोबरच कार्यान्वयनावर भर देण्यात आला. प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले. आपण सर्वांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे हेच आपले कर्तव्य आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 17/06/2025

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक - 17/06/2025 १) मंडणगड - 25.50 मिमी२)...