रत्नागिरीअंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई; चार जणांना अटक--पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ॲक्शन...

अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई; चार जणांना अटक–पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ॲक्शन मोडवर–

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलिस ठाणे हद्दीत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी कुवारबाव येथे ३१ मे ते ३ जून या कालावधीत अंमली पदार्थ विरोधात चार कारवाया केल्या. यामध्ये २ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड पोलिसांनी भरणे नाका, तुतारी एक्सप्रेस या ठिकाणी गस्ती दरम्यान तीन जणांना एकूण ३ किलो २२८ ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवार ३ जून रोजी रत्नागिरी एमआयडीसी येथे गस्त करताना शफाकत हसन राजपूरकर (४० , रा. देवरुख, रत्नागिरी) याला १० ग्रॅम ब्राउन हेरॉईनसह अटक केली. या चारही कारवायांमध्ये अमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा पोलिस विभागाने अंमली पदार्थ संदर्भातील गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी एनडीपीएस ॲक्ट खाली सन २०२४ मध्ये ३ आरोपींना तडीपार केले आहे. तसेच सन २०२५ मध्ये आतापर्यंत ५ आरोपींना तडीपार केले असून अजूनही १२ आरोपींविरोधात तडीपारीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन'राईट टू एज्युकेशन' प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी...

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील...