Modal title

महाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात समावेश करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात समावेश करा

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

मुंबई:

तमाम देशवासियांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, शासन, कार्य तसेच वारसा यांची माहिती देशाच्या भावी पिढीपर्यंत नेण्याबरोबरच भारताचा समृद्ध इतिहास व संस्कृती यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सीबीएससीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवजी महाराज यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सुमारे ३५० वर्षापूर्वी संपूर्ण भारत वर्षाचे स्वाभिमान असलेल्या तसेच हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा १६७४ रोजी करण्यात आलेला राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हते तर ते एक कुशल प्रशासक, कुशल योद्धा तसेच दूरदृष्टी असलेले शासक होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. ते जनकल्याण व आत्मनिर्भरते चे प्रतिक आहे. त्याची रणनीती, शासन व धर्मनिरपेक्ष शासन पद्धती आजही प्रेरणा देते. त्यांचे जीवन व कार्याने विद्यार्थी यांना ना केवळ त्यांच्या इतिहासाची माहीती प्राप्त होईल, नेतृत्व, देशभक्ती आणि सामाजिक एकताचे मूल्य ही शिकायला मिळणार आहे.

या अगोदरही सीबीएससीच्या अभ्यासक्रमात विविध ऐतिहासिक व्यक्तीं व घटना यांचा समावेश करण्यात आला आहे, हि निश्चितच आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या योगदानाला सीबीएससीच्या पाठ्य पुस्तकातही योग्य स्थान मिळाले पाहिजे. त्यांच्या इतिहासाचा समावेश सीबीएससीच्या अभ्यासक्रमात केल्याने देशभरातील विद्यार्थी यांना भारताचा समृद्ध इतिहास तसेच विविध संस्कृती यांचा अधिक जवळून चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यास मिळणार आहे. त्यामुळे आगामी शैक्षणीक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात सामवेश करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी जेणे करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला ती एक आदरांजली ठरेल, असे खासदार वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठवलेले पत्रात नमूद केले आहे.

Breaking News