रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील अनैतिक व्यवसाय प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणात पोलिसांनी अजूनही कसून तपास सुरू ठेवल्याने यामध्ये आणखीन काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे यामुळे या प्रकरणात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
दिनांक २०/०७/२०२३ रोजी सकाळी १४.२० वा. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरामधील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये छापा टाकण्यात आला ज्यामध्ये एक इसम हा दोन पर राज्यातील महिलांना वेश्यागमनाकरिता ठेवून आपल्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवत असल्याचे तसेच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले.
या पथकामार्फत दोन्ही पिडीत महिलांची यातून सुटका करण्यात आली व त्यांना महिला आधार गृह येथे ठेवण्यात आले तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे यातील आरोपित इसम नामे राजेंद्र रमाकांत चव्हाण, वय ४५ , रा. मिरजोळे जांभूळफाटा, रत्नागिरी यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 243/2023 भा.दं.वि.सं. कलम ३७० व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी विभाग श्री. विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. शैलेश सणस यांनी कल्पकतेने करून या गुन्ह्या मध्ये आरोपी राजेंद्र रमाकांत चव्हाण व एका महिलेसह खालील नमूद अन्य ८ आरोपींना अटक केली आहे.
1) अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर, वय ३६, रा. साईचिंतन अपार्टमेंट, बोर्डींग रोड, माळनाका, ता. जि. रत्नागिरी,
2) ओमकार जगदीश बोरकर, वय २६, रा. चिंचखरी, दत्त मंदिर जवळ, ता. जि. रत्नागिरी,
3) समीर मंगेश लिबुकर, वय २३, मूळ रा. साडवली तेलीवाडी, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, सध्या रा. शंखेश्वर नगर, भारत गॅस एजन्सी शेजारी, आरोग्य मंदिर, ता. जि. रत्नागिरी,
4) अरबाज अस्लम चाउस, रा. साखरतर, रहमाण मोहल्ला, ता. जि. रत्नागिरी,
5) साई प्रसाद साळुंखे, रा. सिध्दीविनायक, कोकणनगर, ता. जि. रत्नागिरी,
6) रोहन मंगेश कोळेकर, रा. जास्मीन बिल्डींग, सिध्दविनायक, शिवाजीनगर, ता.जि. रत्नागिरी,
7) प्रविण प्रकाश परब, रा. गवळीवाडी, ता. जि. रत्नागिरी,
8) नवीद अश्रफ कन्वाडकर, रा. अलहसन टॉवर, उद्यम नगर, ता. जि. रत्नागिरी.
यातील नमूद 1 ते ४ आरोपी यांना मा. न्यायालयाने दि. ३१/०७/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. या सर्व प्रकरणात आकाश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक,श्रीम. शितल पाटील,पोलीसउपनिरीक्षक, मपोहवा वैष्णवी यादव, पोहवा राजेंद्र सावंत,
पोहवा मंगेश शिवगण,
पोहवा अरुण चाळके,
पोहवा अमोल भोसले,
पोना वैभव शिवलकर,
पोना आशिष भालेकर,
पोना पंकज पडेलकर,
पोकॉ किरण डांगे,
पोकॉ विक्रांत कदम व
पोकॉ राजेंद्र फुटक या पोलीस पथकाने यशस्वी कामगिरी केली आहे
