रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या सामाजिक सेवा करणारा संस्थेने अनेक
लोकोपयोगी सेवा देणारे उपक्रम राबवले असून त्यापैकी अजून एक महत्वाकांक्षी प्रकल्प “रोटरी स्नेहसेवा वैद्यकीय उपकरणे बँक” ही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली बँक सेवेचे लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
आता रत्नागिरी मधील गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे,ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन,व्हीलचेअर, वॉकर,रुग्णांचे बेड, एअर बेड अशी अनेक वैद्यकीय उपकरणे या बँके मधून वापरासाठी घरी घेऊन जाता येणार आहेत ,या रोटरीचा उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील गरजू व गरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
रोटेरिअन राजेंद्र घाग,असिस्टंट गव्हर्नर शाल्मली आंबुलकर यांचा हस्ते वैद्यकीय उपकरणे बँकचा शुभारंभ आजरोजी करण्यात आला, सदर प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.रूपेश पेडणेकर,सचिव अॅड.मनिष नलावडे,श्री.विनायक हतखंबकर,प्रेसिडेंट इलेक्ट प्रमोद कुलकर्णी,रोहित वीरकर,परेश साळवी,सचिन मुकादम ,राकेश घाणेकर,आनंद चौगुले उपस्थित होते.
रोटरी स्नेहसेवा वैद्यकीय उपकरणे बँक ही सुखकर्ता बंगला,गुरुमळी रोड,गोडाऊन स्टॉप रत्नागिरी येथे सुरू करण्यात आली असून,नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी तर्फे करण्यात आले आहे.