रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर यांची निवड!२०२५...

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर यांची निवड!२०२५ ते २०३० या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५ ते २०३० या आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमध्ये श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर यांची अध्यक्षपदी, तर डॉ. चंद्रशेखर केळकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कुस्ती खेळाला नवी दिशा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कार्य करेल अशी अपेक्षा आहे. निवडीमध्ये अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

  • अध्यक्ष: श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर
  • कार्याध्यक्ष: डॉ. चंद्रशेखर केळकर
  • उपाध्यक्ष: अमित विलणकर, आनंद तापेकर
  • प्रमुख कार्यवाह: सदानंद जोशी
  • सह कार्यवाह: योगेश हरचेकर, वैभव चव्हाण
  • खजिनदार: अंकुश कांबळे
    कार्यकारिणी सदस्य:
    संतोष कदम, सौरभ मलुष्टे, फैय्याज खतीब, राजेंद्र नेवरेकर, आनंदा सनगरे, स्वप्निल घडशी, आनंद दुधाळ, संतोष गोसावी, प्रसाद करमरकर, निलम कुळकर्णी
    निमंत्रित सदस्य:
    संदेश चव्हाण, अभिषेक पवार, दिलीप कारेकर, मानसिंग पवार, रविंद्र वासुरकर, सुयोग कासार, ऋषीकेश शिवगण, संदिप गुरव, कमल नितोरे
    सल्लागार:
    प्रसाद गवाणकर, श्रीकांत वैद्य, दिनकर पवार, अमित नेवरेकर
    या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुस्ती खेळाला अधिक गती मिळेल आणि नवीन पैलवान घडण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...