मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ६३ व्या वर्धापन दिन कार्यक्रम राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्व कर्मचारी, अधिकारी, संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत अनेक विषयांवर स्पष्ट, दिलखुलास संवाद साधला.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी महामंडळाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा असा विश्वास दिला — MIDC हे आजही ‘एक नंबर’वर आहे आणि पुढची शंभर वर्ष देखील ते ‘एक नंबर’वरच राहील याची ग्वाही दिली.
अपप्रचाराच्या काळात सत्य आणि विश्वास महत्त्वाचे आहेत. MIDC चं भवितव्य सुरक्षित आहे, आणि त्याबाबत कुणीही संभ्रमात राहू नये. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन, वेतनवाढ, दिवाळी बोनस, पदोन्नती यासह विविध निर्णयांची अंमलबजावणी केली जाते. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण, आरोग्य आणि सुविधा यांवर विशेष भर दिला जात आहे.
भविष्याकडे पाहणाऱ्या पिढीला NASA-ISRO सारख्या उपक्रमांतून सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते.
आजचा वर्धापन दिन केवळ एक सोहळा नव्हे, तर MIDC कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नव्याने प्रेरणा देणारा दिवस ठरला असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
याप्रसंगी एम.आय.डी.सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. वेलरासू, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, एम.आय.डी.सी एम्प्लॉइझ असोसिएशन चे अध्यक्ष विलास संखे. एम.आय.डी.सी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष के.बी. पाटील, एम.आय.डी.सी एम्प्लॉइझ युनियन अध्यक्ष अभय कोळेकर यांसह एम.आय.डी.सी चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.