रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्याचे लोकाभिमुख उप विभागीय अधिकारी तथा प्रांत जीवन देसाई यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल महसुल दिनी त्यांचा भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर शैलैश गुप्ता यांच्या हस्ते व जिल्हा न्यायाधीश श्री गोसावी.जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोमेंटो आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.जीवन देसाई हे महसुल विभागाचे एक महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची काम करण्याची पद्धत गतिमान असल्याने ते पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचे विश्वास म्हणून ओळखले जातात. जीवन देसाई यांनी रत्नागिरी चे प्रांत म्हणून जुलै 2023 मध्ये पदभार स्वीकारला आणि मागील दोन वर्षात रत्नागिरी आणि संगमेश्वर विभागात अतिशय उत्तम पद्धतीने काम करीत असल्या मुळेच त्यांच्या कामगिरीची शासन व प्रशासनाने दखल घेतली आणि महसूल दिनी त्यांचा सत्कार केला आहे.जीवन देसाई यांनी पुर्वी लातुर व अन्य ठिकाणी उप जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे आणि आज ते रत्नागिरी व संगमेश्वर चे प्रांताधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत…
रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्याचे लोकाभिमुख उप विभागीय अधिकारी तथा प्रांत जीवन देसाई यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल महसुल दिनी त्यांचा भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर शैलैश गुप्ता यांच्या हस्ते व जिल्हा न्यायाधीश श्री गोसावी.जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग.
