रत्नागिरीरत्नागिरी =  कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ आयोजित मूर्ती स्पर्धा

रत्नागिरी =  कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ आयोजित मूर्ती स्पर्धा



 रंजन मंदिर सभागृह, शिर्के प्रशाला रत्नागिरी शहरातील कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ आयोजित गणेश मूर्ती स्पर्धेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस देवून सत्कार करण्यात आला.

या उपक्रमाच्या निमित्ताने मन आनंदाने भरून आलं — कारण ही केवळ एक मूर्ती बनवण्याची स्पर्धा नाही, तर रत्नागिरीच्या सुसंस्कृततेचं, सर्वधर्मसमभावाचं आणि विद्यार्थ्यांच्या अद्वितीय कलागुणांचं दर्शन घडवणारी एक अभिव्यक्ती आहे. “शकीलभाईही ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणतात — हेच रत्नागिरीच्या एकात्मतेचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे.या मंचावर पाहिलं, की जातीधर्माच्या पलीकडे जाऊन रत्नागिरीकरांनी नेहमीच समाजकारण आणि राजकारण केलं. विद्यार्थ्यांच्या हातून साकार झालेल्या सुंदर मुर्त्या बघून त्यांच्या मनगटात दडलेली कला दिसली आणि अभिमान वाटला, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

विशेष अभिनंदन कांचन आणि त्यांच्या टीमचं — २०० हून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र आणून एक आगळी स्पर्धा आयोजित केली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी एक विनंती केली, की ही स्पर्धा दरवर्षी सातत्याने घेतली जावी.

रत्नागिरीकरांच प्रेम आणि आशीर्वाद हेच माझं खरं भाग्य आहे. मंत्री म्हणून माझं स्थान हे फक्त तुमच्या पाठिंब्याचं फलित आहे. माझ्या मनात फक्त एकच इच्छा — या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनोकामना गणरायाच्या कृपेने पूर्ण होवोत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांचे पालक आणि आयोजक मंडळींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आभार मानतो, असे देखील मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

Breaking News