रत्नागिरीसह्याद्रीत देशभक्तीचा जल्लोष – 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सह्याद्रीत देशभक्तीचा जल्लोष – 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ध्वजारोहण, देशभक्तीपर गीत, गुणवंत व खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन सह्याद्री क्रीडा संकुलावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक मारुतीराव घाग यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व प्रतिज्ञा पठणानंतर महाराष्ट्र छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली. अमृता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सुमधुर सादरीकरण केले.

या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत सुर्वे, मारुतीराव घाग, आकांक्षा पवार, सचिव महेशजी महाडिक, प्रकाशजी राजेशिर्के, प्रशांत निकम, माजी पंचायत समिती सभापती सौ. पूजाताई निकम, युवा नेते अनिरुद्ध निकम, गावचे सरपंच, ग्रामस्थ, पालक तसेच विविध शाखांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे व प्रशांत सपकाळ यांनी केले.

दरम्यान, गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय समितीचे चेअरमन व ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शैक्षणिक प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेमींच्या ठेवीवरील व्याजातून बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेत यश मिळवलेल्या मुलींच्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...