Uncategorizedकोकण रेल्वे प्रशासनाने एक महिन्यात मागण्यांची दखल न घेतल्यास रेल रोको करणार!

कोकण रेल्वे प्रशासनाने एक महिन्यात मागण्यांची दखल न घेतल्यास रेल रोको करणार!

👉🏻संगमेश्वर तालुका वासियांचा इशारा, उपोषणास उस्फुर्त प्रतिसाद

✍🏻 रुपेश मनोहर कदम/सायले

▪️मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रजासत्ताक दिनी संगमेश्वर स्थानकात सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणाला संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभला.

▪️राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, वाहतूक संघटना यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि मागण्यांवर ठाम असल्याचा निर्धार या आंदोलनाला अधिक व्यापक रूप देत होता.

▪️सर्वच राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळी भेटी देऊन आपले समर्थन व्यक्त केले.

▪️दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बने तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. त्यांच्यासाह स्टेशनं मास्तर जाधव व RPF अधिकारी यांच्या हस्ते थंड पेय पिऊन उपोषण स्थगित करण्यात आले

▪️रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा निवेदन घेतले. याआधी पाठवलेल्या सकारात्मक प्रस्तावाची पुनरावृत्ती न करता लवकरच मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावे या आशयाचे ते निवेदन होते.रत्नागिरी येथे जाऊन प्रत्यक्ष खात्री करून पुढची योजना आखली जाईल असे सर्वानुमते ठरले.

💫नव्याने दिलेल्या निवेदनानुसार आता आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात आली असून येत्या एक महिन्यात मागण्यांचा विचार न केल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे या रेल रोको ला पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. तालुक्यातील जनता मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी होईल असे यावेळी श्री सुरेश बने व संतोष थेराडे यांनी सांगितले

Breaking News