रत्नागिरीगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी-

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी-

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, — यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.
या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...