आभार या सस्थेने मला जो रत्नभूषण पुरस्कार देवून गौरविले तो गौरव मला महाराष्ट्रातून अनेक पुरस्कार प्राप्त झाले तरीही हा देखणा घरचा पुरस्कार मला महत्वाचा वाटतो कारण या आभार सस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला आणि महिलांचे नमन तयार केले आता ते गाजत आहे म्हणून त्यांचा आज माझ्या हस्ते सत्कार केला व गुरुगौरव पुरस्कार देण्यात आला यासाठी त्यांच्या दूरदृष्टीत्वाचे मनापासून कौतुक आणि माझ्या भगिनींचा हा सत्कार मला रत्नभूषण पुरस्कार दिला त्यापेक्षाही त्यांचा सत्कार मला करायला मिळाला यातच मला धन्यता वाटते महाराष्ट्राचा उद्योग मंत्री म्हणून मी आवर्जून त्यांना माझ्या संस्थेतर्फे फॉरेनच्या व्यासपीठावर नेणार आहे असे भावपूर्ण आश्वासक उद्गगार आभारच्या वार्षिक रत्नभूषण पुरस्कार व गुरूगौरव पुरस्कार सोहळ्याच्या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री, भाषा मंत्री, राज्याचे उद्योग मंत्री नामदार डॉ उदय सामंत यांनी काढले
हा सोहळा स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडला पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याचे साहित्य भूषण कवी आबुट घेर्यातील सूर्य आणि चिपळूणच्या टिळक स्मारक ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री अरुण इंगवले यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मा नामदार डॉ श्री उदय सामंत यांना प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्रीअण्णा सामंत श्री विनोद हळदवणेकर,श्री साईनाथ नागवेकर,डॉ दिलीप पाखरे,नमन सम्राट श्री यशवंत वाकडे, श्री बाबू म्हाप, श्री राहुल पंडित श्री शरद गोळपकर, सौ प्रेरणा विलणकर, आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आभार संस्थेच्या वाटचालीतील अहवालाचे महत्वाचे क्षण आपल्या जोशपूर्ण शब्दात श्री वाघे संस्थेचे सचिव यांनी प्रास्ताविक केले
मा नामदार श्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की कोकणची भजन कला नमन जाकडी हे संपूर्ण जगात एक वैशिष्ट्यपूर्ण असून कोकणाने आणि आभार सारख्या संस्थेने ही कला जपण्याचा जो वारसा जपला आहे तो अद्वितीय आहे आभार सारख्या संस्थेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जो सत्कार केला त्यामुळे आजच आमच्या शासनाने मानधन योजना रु 25000/ देण्याचा जीआर काढला आहे हे मी यावेळी आवर्जून ठासून सांगतो आपल्या भाषणात त्यांनी एखाद्या सामान्य घराण्यात जन्माला आलेला सुपुत्र श्री वाघे आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अशा कला जपतो तेव्हा माझे मन भरुन येते
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अरुण इंगवले साहेब मा सामंत साहेब यांच्यासारख्या अभ्यासू, राजकारणी व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी मला दिलीत लोककला जपण्याचा वारसा याच भव्य दर्शन घडविले ही निव्वळ आपल्या सर्वाना अभिमानास्पद बाब आहे असे नमूद केले
मा डॉ उदय सामत साहेब पालकमंत्री यांच्या हस्ते वयोवृध्द भजनी कलाकार
सौ शैला प्रभाकर करंदिकर रत्नागिरी श्री गिरीश शेठ शंकर विचारे राजापूर श्री विश्वास गणपत करगुटकर आंबोळगड राजापूर श्री मिलिंद आरेकर बुवा नेवरे श्री विनायक डोंगरे बुवा आंबेशेत श्री विकास दत्ताराम भाटकर पेठकिल्ला आणि महाराष्ट्रातील पहिले महिला नमन सादर करणार्या सौ प्रेरणा पुरुषोत्तम विलणकर श्रीमती ज्योती प्रकाश कदम सौ रेश्मा रघुनाथ शिंदे सौ पूनम शरद गोळपकर सौ अर्चना अशोक मयेकर श्रीमती रेखा रविंद्र खातू सौ विनया विजय काळप कु मनस्वी महेश साळवी सौ सर्वता सुधीर चव्हाण सौ रिमा अजय देसाई सौ गीता संदेश भागवत कु पूर्वा विशाल चव्हाण सौ समिक्षा सचिन वालम सौ आकाक्षा सचिनवायंगणकर सौ तन्वी अभिराज नागवेकर सौ शीतल सुधीर सकपाळ कु जुई संजय पावसकर कु शोभना हरिश्चंद्र वरवटकर कु शमिका प्रितम विलणकर सौ वेदा प्रकाश शेट्ये
श्रीमती माधवी मारुती पाटील या सर्वाना शाल, श्रीफळ,सन्मान चिन्ह व गौरवपत्र असा गुरु गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सागर मायगडे, श्री प्रविण सावंतदेसाई, श्री दादा वाडेकर, श्री मदन डोर्लेकर गुरुजी श्री राकेश बेर्डे, श्री लक्ष्मिकात हरयाण बुवा महिला मंडळ शाखा व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली
