मालगुंड येथील भेटीत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
मालगुंड : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मालगुंड ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. विलास पांडुरंग राणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
त्यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय स्वरूपा रवींद्र सामंत साहेब यांची भेट घेतली असता, त्यांनी आपल्या या सहकाऱ्याचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत अभिनंदन केले.
यावेळी उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डॉ. उदय स्वरूपा रवींद्र सामंत साहेब यांनी विलास राणे यांच्याशी चर्चा केली. यामध्ये विलास राणे यांनी मालगुंड गावात भविष्यात शांतता आणि सौहार्दता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे रत्नागिरी तालुक्याचे तालुकाप्रमुख महेश शांताराम तथा बाबूशेठ म्हाप, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नंदकुमार राणे, उद्योजक संतोष उर्फ बंडू साळवी उपस्थित होते.