रत्नागिरीसंगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शबाना लियाकत नेवरेकर यांची...

संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शबाना लियाकत नेवरेकर यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या हॅट्ट्रिक निवडी मुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शबाना लियाकत नेवरेकर यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या हॅट्ट्रिक निवडी मुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…
➡️ अंत्रवली गावातील ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शबाना लियाकत नेवरेकर यांची सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सरपंच सारंगी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडीचा विषय येताच बाबू मानकरी यांनी शबाना नेवरेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सदर प्रस्तावाला माजी सरपंच सुरेश माईन आणि मंगेश सुर्वे (चकोली बाबू) यांनी अनुमोदन दिले. परिणामी शबाना नेवरेकर यांची सलग तिसऱ्यांदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे
निवडीनंतर सरपंच सारंगी सुर्वे यांनी शबाना नेवरेकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच ग्रामसभेत उपस्थित श्रीकांत जाधव, पिंट्या सुर्वे आणि शर्वरी यांनी ठोस पाठिंबा दर्शविला.

शबाना नेवरेकर यांनी यापूर्वी स्थानिक वाद व तंटे निपटारा करताना दाखविलेली पारदर्शकता, निर्णयातील सचोटी आणि मनमिळावू स्वभाव या गुणांमुळे त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा या पदावर विश्वासाने निवडण्यात आले.

शबाना लियाकत नेवरेकर यांच्या सलग तिसऱ्या निवडीमुळे अंत्रवली ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...