रत्नागिरीस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची " अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ "कायद्या अंतर्गत...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ” अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ “कायद्या अंतर्गत कारवाई-

👉रत्नागिरी येथे अनैतिक धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून अनैतिक व्यवहाराला मुलींना बळी पाडणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एमआयडीसी रत्नागिरी येथे अनैतिक व्यापार सुरु असल्याची गोपनीय माहीती मिळाली. या माहीतीच्या आधारे कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखचे एक पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहीती नुसार एक डमी गिऱ्हाईक पाठवून प्लॉट ई-69 मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी येथे छापा टाकण्यात आला असता तेथे एक नेपाळी नागरीक महीला ही पुणे येथील दोन महीलांकरवी देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याने तिचेवर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी मिळून आलेल्या दोन महीलांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई नितीन बगाटे, पोलीस अधीक्षक रत्नागिरी व बी.बी.महामुनी, अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
सपोनि.शबनम मुजावर पोहेकॉ. विजय आंबेकर,पोहेकॉ विवेक रसाळ मपोहेकॉ. स्वाती राणे,मपोकॉ पाटील श्रेणी पोउनि. संदीप ओगले,पोहेकॉ दिपराज पाटील
पोहेकॉ.भैरवनाथ सवाईराम.मपोहेकॉ शितल कांबळे.पोना दत्ता कांबळ

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...