रत्नागिरीरत्नागिरीत श्री देवी भगवती मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू

रत्नागिरीत श्री देवी भगवती मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू

👉 रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिरात यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होणार आहे. दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे देवीला रूपे परिधान करण्यात येतील. दुपारी १२ वाजता देवीची घटस्थापना होऊन आरती केली जाणार आहे.

त्यानंतर २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान दररोज भजन, कीर्तन व पाठ वाचन होणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ढोलवादन स्पर्धा रंगणार असून भक्तांचा उत्साह उंचावणार आहे.

उत्सवाच्या निमित्ताने ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कुमारीका पूजन व घट उचलण्याचा सोहळा पार पडेल. रात्री १२ वाजता पारंपरिक गौंधळ (आराबा) होणार आहे.

शेवटच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता सोने लुटणे कार्यक्रम होऊन नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे.

श्री देवी भगवती मंदिरात होणाऱ्या या नवरात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे मंदिर समितीने आवाहन केले आहे.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...