रत्नागिरी: आज २० सप्टेंबर २०२५ रोजी “आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियान” अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ च्या मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth) राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्राने (National Centre for Coastal Research) प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी मांडवी समुद्र किनाऱ्यावरील २०० मीटर लांब व ४० मीटर रुंद परिसरातील सुमारे १.२६ टन कचरा गोळा केला गेला. या कचऱ्यातील प्लॅस्टिक, रबर, काच, कपडा, इ. प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर, शिक्षण संचालक डॉ. सतिश नारखेडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मार्गदर्शनाखाली मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. या स्वच्छता अभियानाच्या संयोजन समितीचे समन्वयक म्हणून डॉ. रविंद्र पवार, सह-समन्वयक म्हणून डॉ. भावेश सावंत यांनी तर सदस्य म्हणून डॉ. सुहास वासावे, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, डॉ. संतोष मेतर, डॉ. संदेश पाटील, डॉ. अजय देसाई, श्री. भालचंद्र नाईक यांनी नियोजन केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. आसिफ पागारकर, डॉ. दबीर पठाण, डॉ. राहुल सदावर्ते, डॉ. जयाप्पा कोळी, डॉ. मनिषा सावंत, श्री. मकरंद शारंगधर, डॉ. गजानन घोडे, डॉ. राजू तिबिले, डॉ. विजय मुळ्ये, डॉ. (सौ.) संगीता वासावे, डॉ. (सौ.) वर्षा भाटकर, डॉ. मंगेशकुमार पाटील, श्री. साईप्रसाद सावंत, श्रीमती मीनल काळे, श्रीमती प्रज्वला बागुल, श्री. अण्णासाहेब कारखिले, श्रीमती काजल राठोड, कु. मोनाली कोकाटे, श्री. अरूण गौड, श्री. मयुरेश नागवेकर, श्री. प्रतिक यादव, श्री. मंगेश चापडे आदींनी सहभाग घेतला. तसेच सागरी सीमा मंच चे पदाधिकारी श्री. संजीव लिमये व श्री. रंजन आगाशे या मोहिमेत सहभागी झाले. या कार्यक्रमाला रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गारवे व माजी नगराध्यक्ष श्री. मिलिंद किर यांचे सहकार्य लाभले.
मांडवी किनारी स्वच्छता अभियानमत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी चा सहभाग: आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियानाचे औचित्य
