गावभेट दौऱ्यात अनेक गावातील विकासकामाचे व नागरिकांचे वैक्तिक प्रश्न देखील मार्गी
लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार किरण सामंत यांनी दिनांक 17,18,19 सप्टेंबर या दिवशी दाभोळे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जाऊन दौरा केला. हा गावभेट दौरा प्रत्येक गावच्या विकासाच्या दृष्टीने नवसंजीवनी देणारा असल्याचा विश्वास माजी पंचायत समिती सभापती जया माने यांनी व्यक्त केला. विशेषता आमदार किरण सामंत यांची कार्यपद्धती विशेष भावणारी ठरली. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन सोबत महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महावितरण,अशा सर्व खात्यांचे अधिकारी कर्मचारी यांना घेऊन प्रत्यक्ष ग्रामस्थांची चर्चा घडवून आणत थेट नागरिकांच्या समस्याना न्याय देण्याचे काम केले. त्याचबरोबर शासनाच्या सर्व योजना गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजेत यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने मेहनत घेतली पाहिजे असे आदेश दिले. या गाव भेट दौऱ्यात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, तसेच वैयक्तिक शासकीय योजनांच्या लाभासंदर्भातील तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष देत मार्गी लावावे असे सांगितले. गावात शिल्लक असणारी विकासकामे पुढील काही कालावधीतच मार्गी लागतील असा ठाम विश्वास नागरिकांना दिला. झटपट किंवा तत्परतेने एखाद्याला न्याय कसा आमदार किरण सामंत देतात ते या दौऱ्यातून दिसून आले व एक आदर्श कार्यकुशल आमदार कसा असावा याचे उदारहण दाखवून दिले.यावेळी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विलास चाळके यांनी आमदारांच्या या दौऱ्याचे कौतुक करत आभार मानले.या दौऱ्यात पक्षाच्या सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे हा दौरा दाभोळे जिह्वा परिषद गटातील विकासकामाना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.