राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापनेसह या उत्सवाची सुरुवात होणार असून गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्सवाची सांगता होणार आहे.
सलग ११ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, आरत्या, महाप्रसाद व जागर या उत्सवामध्ये पार पडणार आहेत. घटस्थापना सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. दैनंदिन आरती सायंकाळी ७.३० वाजता, तर महाप्रसाद दुपारी १.३० वाजता, दैनंदिन जागर रात्री १० ते १२ या वेळेत रंगणार आहे.
या वर्षीचे खास आकर्षण म्हणजे २२ सप्टेंबर रोजी पहिल्या माळेला ट्वेंटी-ट्वेंटी भजनाचा जंगी सामना देवगड तालुक्यातील नामवंत भजनी बुवा श्री. संदीप पुजारे आणि बुवा श्री. अखिलेश फाळके यांच्यात भक्तिमय वातावरणात रंगणार आहे.
श्री नवलादेवी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.