Uncategorizedसावर्डे विद्यालयात कुष्ठरोग जनजागृती फेरी व शपथऔषधे घ्या कुष्ठरोग टाळा - प्रफुल्ल...

सावर्डे विद्यालयात कुष्ठरोग जनजागृती फेरी व शपथऔषधे घ्या कुष्ठरोग टाळा – प्रफुल्ल केळसकर

सावर्डे – सांसर्गिक रोगापैकी कुष्ठरोग सर्वात कमी सांसर्गित आहे. कुष्ठरोग नियमित रोगापैकी एक आहे त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नयेत परिसरातील सर्वांना माहिती देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी.कुष्ठरोगाची लक्षणे वेळीच जाणून घेतली व योग्य निदानासह औषध उपचार केले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो व आपण कुष्ठरोगाचे निर्मूलन करू शकतो असे मत सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यवेक्षक व्याख्याते प्रफुल केळसकर यांनी व्यक्त केले.
सह्याद्री शिक्षण संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात हुतात्मा दिन म्हणजेच महात्मा गांधीजी पुण्यतिथीचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी अखेर आयोजित स्पर्श अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृतीसाठी प्रभात फेरी व कुष्ठरोग निर्मूलन व स्वच्छ्ता शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डेचे पर्यवेक्षक प्रफुल्ल केळसकर, सहाय्यक रिया जाधव,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात पुढे व्याख्याते प्रफुल्ल केळसकर यांनी कुष्ठरोगाच्या लक्षणांची सविस्तर माहिती देऊन कुष्ठरोगाच्या लवकर निदानाने व नियमित उपचाराने शारीरिक विकृती व विद्रुपता निश्चितपणे टाळता येते व व सर्वांच्या सहभागाने कुष्ठरोगाचे निर्मूलन सुद्धा सहज शक्य आहे.कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज घातक असून त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले व व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना या रोगाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी हातभार कसा लावता येतो त्याची माहिती दिली. प्राचार्य राजेंद्र वारे यांनी प्रस्ताविकातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानाचा उद्देश विशद केला.
कुष्ठरोग जनजागृती व स्वच्छ्ता शपथ घेताना विद्यार्थी व मान्यवर

Breaking News