Uncategorizedमहाराष्ट्रातील भाजपा जिल्हाध्यक्ष व युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक मुंबई...

महाराष्ट्रातील भाजपा जिल्हाध्यक्ष व युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालय येथे संपन्न झाली.

याप्रसंगी उपस्थित राहून येत्या वर्षभरात सदस्यता नोंदणी बरोबरच राबविण्यात येणारे जनजागृती कार्यक्रम, अभियान याविषयी उपस्थितांशी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संवाद साधला.

संघटन पर्व अभियानांतर्गत राज्यात सुरु असणाऱ्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता १९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील, संघटन महामंत्री रवि अनासपुरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आदी उपस्थित होते… पदभार स्वीकारल्या पासून भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणी कडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे तसेच युवकांची फळी तयार करून त्यांना राजकारणात जास्तीत जास्त संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत..

Breaking News