चिपळूणजेष्ठ पत्रकार इकलाक खान यांना "कोकणरत्न"मानद पदवी पुरस्कार जाहीर

जेष्ठ पत्रकार इकलाक खान यांना “कोकणरत्न”मानद पदवी पुरस्कार जाहीर

चिपळूण-रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार दैनिक रत्नागिरी टाईम्स चे चिपळूण प्रतिनिधी इकलाक खान याना स्वतंत्र राज्य कोकण अभियान तर्फे प्रतिष्ठेचा कोकणरत्न मानद पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे.१३ डिसेंम्बर रोजी मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
इकलाक खान यांनी १९९६ पासून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. परिस्थितीजन्य परखड लिखाण,अभ्यास आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी पत्रकारिता या माध्यमाचा त्यांनी पुरेपूर उपयोग समाजासाठी करून दिला.गेली २८ वर्ष कोकणातील अग्रगण्य दैनिक रत्नागिरी टाईम्स मध्ये कार्यरत राहून त्यांनी अत्यंत परखड लिखाण केले.चिपळूण मधील २०२१ च्या महापूरानंतर “कथा महापूराची”या सदराखाली सतत लिखाण करून चिपळूणची भयाण परिस्थिती समोर आणली, आणि त्याची दखल शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाला घ्यावी लागली.त्यांच्या लिखाणाची ही मालिका कोकणात चांगलीच गाजली होती.
अंमलीपदार्थ विक्री आणि सेवन,कोकणातील सावकारी या विषयात इकलाक खान यांनी केलेल्या लिखाणामुळे एक मोठी चळवळ उभी राहिली आणि गृहविभागाने देखील त्याची योग्य दखल घेतली होती.खाजगी शाळामधील नियमबाह्य फी वाढ, कोकणातील पर्यटन, कोकणातील गाळाने भरलेल्या नद्या,कोयना धरणातील वाया जाणारे अवजल,तीवरे धरणफुटी तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसन,या संदर्भात देखील त्यांनी उल्लेखनीय लिखाण करून शासकीय यंत्रणेचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले होते.
कोकणातील राजकीय घडामोडी तसेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य या संदर्भात तर इकलाक खान यांनी लक्षवेधी लिखाण करून राजकीय क्षेत्राचे देखील लक्षवेधून घेतले होते.
त्यांच्या याच कामाची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियानाकडून त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा कोकणरत्न मानद पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.१३ डिसेंम्बर रोजी मुंबई येथे स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे,वरिष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर,मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Breaking News