रत्नागिरी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कालावधीमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगी शिवाय व संबंधीत परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी निर्बंध घातले आहेत.मा. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणूका 2025 आदर्श आचारसंहितेबाबत संदर्भिय एकत्रित आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भितीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास मा. राज्य निवडणूक आयोगाकडील 04 नोव्हेबर 2025 रोजीच्या आदेशान्वये आचारसंहिता कालावधीमध्ये जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा 1995 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निर्बंध घातले आहेत. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
