Home रत्नागिरी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचे घवघवीत यश – श्रावणी राठोड व नेहा जाधवची बाजी

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचे घवघवीत यश – श्रावणी राठोड व नेहा जाधवची बाजी

0
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचे घवघवीत यश – श्रावणी राठोड व नेहा जाधवची बाजी

सावर्डे – चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण/मुंबई यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रावणी राठोड व नेहा जाधव या विद्यार्थिनींनी यशाची चमकदार नोंद केली.

माध्यमिक गटात इयत्ता नववी (क) मधील कुमारी श्रावणी संतोष राठोड हिने प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तिचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयीन गटात इयत्ता अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कुमारी नेहा सुनील जाधव हिनेही दमदार प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळवला. तिलाही रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील विविध विद्यालये व महाविद्यालयांमधील सुमारे 75 विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. चुरशीच्या स्पर्धेत सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश लक्षणीय ठरले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विद्यार्थिनींना तसेच मार्गदर्शक मराठी शिक्षक योगेश नाचणकर, अनुजा बागवे स्फूर्ती जाधव, ज्योती निकम व महेश गंगावणे यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, संचालक श्री. शांताराम खानविलकर, सेक्रेटरी महेश महाडिक, पदाधिकारी, पालकवर्ग आणि ग्रामस्थ यांनी दोन्ही विजेत्या विद्यार्थिनींचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here