रत्नागिरीप्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दाखविली मानवतावाद आणि माणुसकी

प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दाखविली मानवतावाद आणि माणुसकी

नागपूर येथील भाजपाच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणारे लहू गावकर यांची अँजिओप्लास्टी नागपुरातील स्पंदन रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. ही बातमी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना समजताच त्यांनी वेळातवेळ काढूनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.
याप्रसंगी उपस्थित गावकर कुटुंबीयांशी देखील आत्मीयतेने संवाद साधला. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीने लहुजी व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले..लहुजी हे कार्यतत्पर अधिकारी असून त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी सदिच्छा आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.. आमदार रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मानवतावाद आणि माणुसकीचे दर्शन घडविले त्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले…

Breaking News