एकूण ५ गुन्हे उघडकीस. रुपये ६,२७,०००/-किमंतीचा मुद्देमाल जप्त.
👉रत्नागिरी तालुक्यातील
पावस व शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. सदरबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सदर पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या.
सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतीचे आधारे (1) राहुल कुंदन तोडणकर वय-29, रा. शिवलकर वाडी, आलावा जाकिमिऱ्या रत्नागिरी (2) शुभम निलेश खडपे वय 24, रा. गोडावुन स्टॉप नाचणे ता. जि. रत्नागिरी (3) मुस्तफा गुड्डु पठाण वय 22, रा. गोडावुन स्टॉप नाचणे, रत्नागिरी (4) विकास महेश सुतार वय 19, रा. थिबा पॅलेस गार्डनचे बाजुला, रत्नागिरी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता नमुद आरोपीत यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपी यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहीत्य असा एकूण 6,27,000/- रु. किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे –
1) पुर्णगड पोलीस ठाणे गु.र.नं 05/2025 भा.न्या.सं. कलम चे कलम 334 (1), 305 (अ),
2) पुर्णगड पोलीस ठाणे गु.र.नं 06/2025 भा.न्या.सं. कलग चे कलम 334 (1), 305 (अ)
3) रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.र.नं 29/2025 भा.न्या.सं. कलम चे कलम 303 (2)
4) पुर्णगड पोलीस ठाणे गु.र.नं 17/2025 भा.न्या.सं. कलम चे कलम 334 (1), 305 (क).
5) पुर्णगड पोलीस ठाणे गु.र.नं 18/2025 भा.न्या.सं. कलम चे कलम 305 (अ),62
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.