Uncategorizedप्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा - जिल्हाधिकारी

प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी


रत्नागिरी, दि. 3 (जिमाका) : लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले अर्ज तसेच अद्याप प्रलंबित असणारे अर्ज संबंधित विभागाने तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर‍ सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज माहे फेब्रुवारी 2025 चा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदींसह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी लोकशाही दिनात प्राप्त अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.

Breaking News