रत्नागिरी येथे सुरू झालेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मा.उदयजी सामंत साहेब यांनी अगत्यपूर्व भेट दिली.
रत्नागिरीतल्या शिवरुद्र स्पोर्ट्स क्लब येथे भरवण्यात आलेल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा आनंद लुटण्यासाठी क्रिस्टल ग्रुपच्या विनंतीला मान देऊन आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मा.सामंत साहेब स्पर्धेच्या ठिकाणीआवर्जून उपस्थित होते. क्रिस्टल ग्रुप तर्फे स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. मा. सामंत साहेब यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंशी संवाद साधला. आयोजकांशी चर्चा करत असताना त्यांच्या अत्यंत शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मा. साहेबांनी क्रिस्टल ग्रुपचे कौतुक केले. मॅचच्या सुरुवातीला टॉस करून त्या मॅचचा शुभारंभ मा. सामंत साहेबांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी स्वतः फलंदाजीचा आनंद घेत या स्पर्धेत सहभाग दर्शवला. मैदान कोणतेही असो विजय खेळी सामंत साहेबांचीच असते हे पुन्हा एकदा त्यांनी टर्फ ग्राउंड वर देखील सिद्ध केले.
विनंतीला मान देऊन मा. सामंत साहेब यांनी स्पर्धेला लावलेली हजेरी स्पर्धकांसाठी तसेच आयोजकांसाठी खूप प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
