महाराष्ट्र पोलिसांना अनेक कारणांमळे देशातील अग्रगण्य व सक्षम पोलीस दलांपैकी एक मानलं जातं, महाराष्ट्र पोलिसांमध्ये महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे आणि अत्यंत महत्वाचा झाला आहे. त्या विशेष भूमिका आणि जबाबदाऱ्या निभावत आहेत. महिला व बालसरक्षा विभाग, महिला सहाय्य केंद्र महिला हेल्पडेस्क. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, मानव तस्करीविरोधी यनिटस इ. महिला सल्ला केंद्र ये पीडित महिलांचा विश्वास संपादन करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते.
रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अंमलदार सौ. रमा प्रसाद करमरकर यांच्या सह चिपळूण सायकलिंग क्लबच्या महिला रायडर्स
डॉ. सौ. मनिषा वाघमारे, डॉ. सौ. अश्विनी गणपत्ये, सौ. ज्योती परांजपे यांनी नुकतीच ६७८ किमी सायकलिंग करुन वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनच्या (WUCA) नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.
नवीन वर्षाचा पहिला आठवडा हा पोलिस दलाचा ‘रेझिंग डे’ सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून दि. ०१ जानेवारी रोजी या चारही महिला सायकलपटूंनी थिबा पॅलेस, रत्नागिरी येथून आपली मोहिम सुरु केली. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी सर यांच्या शुभहस्ते या सायकलपटूंना झेंडा दाखवून त्यांच्या मोहिमेला शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने आपल्या सुरेल वाद्य वादनाच्या घोषात सायकलपटूंना रवाना केले.
थिबा पॅलेस, रत्नागिरी या हेरिटेज वास्तूला भेट देऊन ख-या अर्थी सफर सुरु झाली. वाटेतील पुरातन कर्णेश्वर मंदिर, डेरवण शिवसृष्टी यांना भेट देत खेड, कशेडी मार्गे त्यांनी रायगड जिल्ह्यात प्रवेश केला. महाड, पेण नंतर ठाणे जिल्ह्यातील पनवेल, कल्याण मार्गे नाशिकच्या दिशेने त्यांनी कूच केली. आव्हानात्मक असा कसारा घाट पार करुन इगतपुरीला त्यांचा नाशिक जिल्ह्यात प्रवेश झाला. नाशिक नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ लेण्यांशी पोचून वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनच्या (WUCA) नव्या विक्रमाची त्यांनी पूर्तता केली. चार महिला सायकलिस्ट्स यांनी संपूर्णतः स्वहिमतीवर हा प्रवास पूर्ण केला. या विक्रमाची वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन (WUCA) कडून तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत घोषणा होईल.
या प्रवासादरम्यान वाटेत लागणा-या पोलिस स्थानकांना भेट देत पोलिस दल व सामान्य नागरिक यांच्यातील दुवा बनण्याची भूमिका या महिला सायकलस्वारांनी निभावली. ठिकठिकाणचे नागरिक, सायकलपटू यांनी महिला सायकलस्वारांची आवर्जून चौकशी करुन शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर चे मा.पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या हस्ते सर्व सायकलस्वारांचा सत्कार करुन या प्रवासाची सांगता झाली. या विक्रमाबद्दल समाजाच्या सर्व थरातून चारही सायकलपटूंचे कौतूक होत आहे. चिपळूण सायकलिंग क्लब, ठिकठिकाणचे नागरिक, पोलिस दल यांच्या शुभेच्छांच्या पाठबळावरच हा प्रवास यशस्वी पार पडला असे या सायकलपटूंनी आवर्जून सांगितले. तसेच पोलीस रेझिंग डे निमित्त स्वतःला आणि समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा संकल्प रमा करमरकर यांनी केला होता, तो पुर्ण झाला याचा आनंद व्यक्त केला, तसेच या राईडमधून मला पोलीस रेझिंग डे चा अर्थ नव्याने जाणवला,पोलीस हे फक्त कायदा-सूव्यवस्था राखणारे नसून समाजाला प्रेरणा देणारे, सशक्त, तंदरुस्त आणि सकारात्मक ऊर्जेचा स्नोत आहोत, आमच्या या प्रवासाने तंदरुस्त शरिर, कणखर मन टीमवर्क आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अनुभवता आली असे मनोगत रमा करमरकर यांनी व्यक्त केले.
