रत्नागिरीराज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

• सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50 टक्के पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले
• 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आज पत्रकार परिषद आहे
• ज्या जिल्हा परिषदेत निवडणूका होत आहे , ते जिल्हे आहे कोकण विभागातील रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
• छत्रपती संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी , धाराशिव व लातूर अशा 12 जिल्हा परिषद आहेत
• या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते द्यावे लागेल, 1 मत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावे लागेल आणि 1 मत पंचायत समिती साठी द्यावं लागेल
• या निवडणुकीत नाम निर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे
• या निवडणुकीत राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे
• जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी सुद्धा नाम निर्देशांक पत्रासोबत दाखल करणे आवश्यक आहे
• या निवडणुकीत मतदान केंद्र 25,482 आहेत या निवडणुकीसाठी EVM चा वापर करण्यात येणार आहे
• वीज , पिण्याच्या पाण्याची सुविधा , शौचालयाची सुविधा करण्यात येणार आहे
• काही मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण करण्यात येतील
• पिंक मतदार केंद्र सुद्धा निर्माण केले जातील , तिथे निवडणूक अधिकारी सर्व महिला असतील
• या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत
• मतदाराला मतदार केंद्र शोधण्यासाठी मताधिकार APP निर्माण केला आहे
• या निवडणुकीत एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहेत
• निवडणुकीच्या 24 तास आधी प्रचाराची समाप्ती होईल
• या निवडणुकीत 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिट वापरणार
• 2.09 कोटी मतदार निवडणुकीत मतदान करतील
• 1 लाख 28 हजार निवडणूक अधिकारी, कर्मचारी असणार
• नाम निर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
• नाम निर्देशन पत्र छाननी 22 जानेवारी 2026
• उमेदवारी माघारी अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजे पर्यंत
• अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3.30 नंतर
• मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7.30 ते सायंकाळी .5.30 पर्यंत
• मतमोजणी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 पासून

Breaking News