चिपळूणश्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदीश्री. राजन रमाकांत खेडेकर यांची निवड…

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदीश्री. राजन रमाकांत खेडेकर यांची निवड…

(चिपळूण) श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची निवड सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूण येथे करण्यात आली. यावेळेस संचालक मंडळापैकी श्री.कुंदन खातू, श्री. मल्लेश लकेश्री, श्री.सिद्धेश लाड, श्री.विनोद फणसे, श्री.शाळीग्राम विखारे, श्री.सुहास चव्हाण, सौ. शिल्पा जागुष्टे, श्री.विलास चिपळूणकर आदी संचालक उपस्थित होते. कार्यकारी मंडळाच्या सदर सभेमध्ये सर्वानुमते श्री.राजन रमाकांत खेडेकर यांची कार्याध्यक्ष पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री.राजन रमाकांत खेडेकर हे गेली २० वर्षे श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत असून यापूर्वी विश्वस्त आणि उपकार्याध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी संचालक असून जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तसेच चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेचे संघटक म्हणूनही त्यांनी पद भूषविले आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री.राजन रमाकांत खेडेकर यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.प्रशांत देवळेकर, माजी अध्यक्ष श्री.उदयशेठ गांधी तसेच उपाध्यक्ष श्री.अशोक मेहेंदळे, श्री.उल्हास पवार, सौ.सई वरवाटकर, संस्थेचे विश्वस्त श्री.वसंतशेठ उदेग, डॉ.यतीन जाधव त्याचप्रमाणे वैश्यनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. हेमंतशेठ शिरगावकर, शिवसेना तालुका संघटक व माजी नगरसेवक श्री.राजू देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री.सचिन उर्फ भैय्या कदम, युवासेना शहर प्रमुख श्री.पार्थ जागुष्टे, वैश्य युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. श्रीनाथ खेडेकर, उद्योजक श्री.प्रथमेश कापडी, श्री.विजय गांधी, श्री.काणेकर, श्री.कमलाकर, श्री.शुभम देवळेकर, सौ.समृद्धी देवळेकर, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. भाऊ कांबळे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्री.राजन रमाकांत खेडेकर यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News