Home रत्नागिरी नामनिर्देशन पत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने नसावीत, दालनात पाच व्यक्ती

नामनिर्देशन पत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने नसावीत, दालनात पाच व्यक्ती

0
नामनिर्देशन पत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने नसावीत, दालनात पाच व्यक्ती

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी कार्यक्रम 13 जानेवारी 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या वाहने यांचा समावेश नसावा. नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक /सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल, यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक कालावधीत जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणीस प्रतिबंध करण्यात येत आहे. हे आदेश 7 फेब्रुवारी 2026 रोजी चे 24.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here