सुमारे साडेसात लाखाचे झाले नुकसान…
गोठ्यातील गाईला वाचवण्यास ग्रामस्थाना मिळाले होते यश..काल सायंकाळी ५ च्या सुमारास लागली होती आग!
ग्रामस्थांचे प्रयत्न आणि देवरुख नगर पंचायतीची अग्निशामक गाडी यामुळे अग्निवर नियंत्रण मिळण्यास आले होते यश!
सत्यवान विचारे/संगमेश्वर.
कोणा अज्ञाताने लावलेल्या वणव्या मुळे संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडी येथील श्रीमती जरीना मोडक यांच्या मालकीच्या घरासह गोठा बेचिराख झाला आहे.
या जळlलेल्या घराचा तलाठी श्रीमती, सुमिता पाटील यांनी पंचनामा घातला असता सुमारे साडेसात लाखाचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
▪️ श्रीमती, जरीना मोडक यांच्या घरात श्री, मेहबूबअब्दुल रफिक मुल्ला रा, कळंबस्ते हे भाड्याने राहत असलेल्या घराला आग लागल्याचे संमजताच स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला.
रिक्षा चालकाचे शर्थीचे प्रयत्न
चारी बाजूने वनवा भडकला असता वनव्याच्या भक्षस्थानी राहते घर पडल्याचे पाहताच आणि जवळ पास आग विझवन्या साठी पाणी नसल्याचे पाहताच मालप वाडीतील रिक्षा चालक श्री, योगेश मालप यांनी आपल्या रिक्षातुन लंlबे वाडीतून पाणी आणून ग्रामस्थ्यांच्या मदतीने आगीवार नियंत्रण मिळण्यांचा प्रयत्न केला.
मात्र आगीने रोद्र रूप धlरण केले होते. याची खबर ग्रामस्थानी गावचा तलाठी श्रीम, सुमिता पाटील यांना दिली, सुमिता पाटील आणि मंडळ अधिकारी श्री, ये,जी, कदम हे नुकतेच सातबारा आधार लिंकचे काम आटोपून देवरुखला निघाले होते, ते बुरंबी येथे पोचले असता त्यांना आगीची माहिती मिळाली.
श्री, कदम यांनी तात्काळ
तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री, सुदेश गोताड यांना कळवली, श्री, गोताड यांनी देवरुख नगर पंच्यायतीच्या अग्निशमक दलाला देऊन तात्काळ मदतीचे आदेश दिले.
नायब तहसीलदार यांच्या कडून आगीचे वृत्त कळताच देवरुख इथून अग्निशमन दलाची गाडी त्वरित घटनास्थळी निघाली, आगीचे नेमके ठिकाण माहिती नसल्याने मंडळ अधिकारी श्री, कदम बुरंबी इथून त्यांच्या सोबत घटना स्थळी पोचले. ( या सर्व प्रकारमुळे लोकांचा गैरसमज होऊन मंडळ अधिकारी स्वतः अग्निशमन दळाची गाडी घेऊन आल्याचा समज झाला, )
शेवटी तासाभराच्या प्रयत्नाने ग्रामस्थ आणि अग्निशमक यंत्रणेमुळे आगीवर नियंत्रण मिळण्यास यश आले होते.
अज्ञाताने लावलेल्या आगीत जैविकतेचे नुकसान झालेच त्याच बरोबर पूर्ण घरासह गोठा जळून खाक झाला, अनेक आंबा कलमlची, काजुची झाडे या अगीच्या भक्षस्थानी पडली.
केलेल्या पंचयादीनुसार जरीना मोडक यांचा गोठा आणि राहत्या घरासह घरात राहणारे भाडोत्री श्री, मैहबूब अब्दुल रफिक मुल्ला यांचे मिळुन एकूण 7,42,250 रुपये नुकसान झाल्याचे नमूद करणेत आले आहे.
▪️आग विझवण्यासाठी हनीफ वलेले, रफिक वलेले, नासिर दसुरकर,
बाबु सुर्वे, विवेक मालप, प्रफुल मालप, बंडू गिते, अन्वर धामस्कर, गैबर मुल्ला, मेहबूब मुल्ला, भिवा तांबे, अब्ररार लांबे
आदी ग्रामस्थानी विशेष प्रयत्न केले.त्यामध्ये विषेश प्रयत्न हे रिक्षाचालक योगेश मालप यांनी केल्याचे समजताच मंडळ अधिकारी श्री, ये, जी, कदम यांनी त्यांचे कौतुक केले आहे.