रत्नागिरीदेवूड विद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा.

देवूड विद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा.

करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था करजुवे तालुका संगमेश्वर संचलित श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड तालुका रत्नागिरी या विद्यालयाचा रौप्य महोत्सव वर्षपुर्ती सोहळा शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य श्री शशिकांत नलावडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,जिल्हा कोषाधिकारी श्री प्रविण बिरादार साहेब,प्राथ शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी डॉ दत्तात्रय सोपनूर सर,संस्थेचे सेक्रेटरी श्री देवस्थळी सर , संचालक श्री विकास नलावडे ,निरंजन नलावडे, सौ प्रिया नलावडे,सौ सूवर्णा देवस्थळी सल्लागार समिती सदस्य श्री संजय देसाई, किसन घाणेकर, श्रीकांत देसाई, यशवंत घाणेकर,विजय कानडे, वसंत रेवाळे, रविंद्र देसाई, प्रकाश दाजी देसाई, सुरेश देसाई, गंगाराम घाणेकर, राघोजी घाणेकर, संदेश घाणेकर, पांडूरंग घाणेकर, गोविंद घाणेकर, नंदकुमार पंडित, विठोबा गोनबरे, अनिल गोताड, सौ रिया पांचाळ, सुनिल गोताड,रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक श्री अरुण जाधव, पांडूरंग नाईक, सुनिल पाटील, दतात्रय रायरीकर, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश जाधव, श्री नांदगावकर मामा, तसेच परिसरातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक सहकारी वर्ग, मध्यमिक विदयालय करजुवेचे मुख्याध्यापक श्री कुवळेकर,श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ, देऊड च चे अध्यक्ष विश्वास गोताड उपाध्यक्ष किशोर घाणेकर सचिव मंगेश घाणेकर, खजिनदार विनायक रेवाळे चवे गावचे सरपंच श्री गावणकर माजी सरपच श्री देवजी गावणकर , ओरी गावचे माजी सरपंच श्री संकेत देसाई गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते
ककार्यक्रमाचे उद्घाटन व स्मरणिका प्रकाशन शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर देणगीदार, मान्यवर व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहूणे श्री म्हात्रे सरांनी शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले व शाळेला व संस्थेला आपले सहकार्य नेहमीच राहिल असे आश्वासन देवून शुभेच्छा दिल्या. श्री उदय सामंत पालक मंत्री याचे प्रतिनिधी श्री बाबू म्हाप यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री शशिकांत नलावडे सर यांनी संस्थेवर विश्वास ठेवून शाळेची प्रगती केली याबददल सलागार समिती सदस्य, ग्रामस्य व पालकाचे आभार मानले.यावेळी सर्व संस्था संचालक,सलागार समिती सदस्य, देणगीदार, दोन्ही शाळेचे कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ प्रतिनिधी, हितचिंतक यांचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याधापक श्री पुजारी सर यांनी २५ वर्षामधील आठवणीना उजाळा दिला व सर्वांच्या सहकार्याप्रति ऋण व्यक्त केले.र सकाळ सत्रामध्ये महिला साठी हळदी कुंकू कार्यकम संपन्न झाला सायंकाळच्या सत्रात शालेय गुणवंत विद्यार्थाचा पारितोषिक वितरण तसेच विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ व सांस्कृतिक कलामंच निर्मित दोन अंकी सामाजिक नाटक ‘अति पण किती ‘ हा नाट्य प्रयोग संपन्न झाला. या दिमाखदार व संस्मरणिय कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिले बददल शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीशैल्य पुजारी सर व गौरव समितीचे अध्यक्ष व गावचे सरपंच श्री संजय दादा देसाई यांनी आभार व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री प्रदिप पवार सर तर आभार श्री संदेश रहाटे यानी मानले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करणे साठी देवूड व करजुवे दोन्ही शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , सर्व पालक , माता पालक, गावातील महिला यांनी मेहनत घेतली.

Breaking News