रत्नागिरीरत्नागिरीकरांच्या समृद्ध भविष्यासाठी शिळ आणि पानवल धरणांचा कायापालट होणे फार गरजेचे.नगराअध्यक्ष शिल्पा...

रत्नागिरीकरांच्या समृद्ध भविष्यासाठी शिळ आणि पानवल धरणांचा कायापालट होणे फार गरजेचे.नगराअध्यक्ष शिल्पा सुर्वे

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी असलेल्या शिळ आणि पानवल धरणांच्या पुनर्विकास कामाची प्रत्यक्ष नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे व पाणी सभापती निमेश नायर यांनी पाहणी केली. पाण्याचा प्रश्न हा केवळ तांत्रिक नसून तो प्रत्येक रत्नागिरीकराच्या दैनंदिन आयुष्याशी आणि शहराच्या विकासाशी जोडलेला आहे असे मत व्यक्त केले

शहराचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याकडे पाहता भविष्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी या धरणांचे बळकटीकरण आणि गाळ उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर

पाणी साठवण क्षमता वाढेल: पावसाळ्याचे पाणी अधिक प्रमाणात साठवून ठेवता येईल.

नियमित पाणीपुरवठा: उन्हाळ्याच्या दिवसात होणारी पाणी कपात इतिहासजमा होईल.

शहराचा विकास: शाश्वत पाणीपुरवठ्यामुळे शहराच्या औद्योगिक आणि निवासी विकासाला नवी गती मिळेल.

“विकास” म्हणजे केवळ रस्ते किंवा इमारती नव्हे, तर नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांची गुणवत्ता सुधारणे होय. लवकरच रत्नागिरी शहर पाणी टंचाईच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त होईल, हा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केला आहे

कामाचा दर्जा आणि गती याबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने ‘सुजलाम सुफलाम रत्नागिरी’ हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे असेही सौ.शिल्पाताई सुर्वे म्हणाल्या

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...