Home रत्नागिरी लक्ष्मी ऑरगॅनिक सारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही म्हणजे नाही : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ उदय सामंत–

लक्ष्मी ऑरगॅनिक सारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही म्हणजे नाही : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ उदय सामंत–

0
लक्ष्मी ऑरगॅनिक सारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही म्हणजे नाही : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ उदय सामंत–

रत्नागिरी मधील महायुतीच्या जाहीर सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले मोठे विधान–.

कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक
जनतेच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिक सारखे प्रदूषणकारी प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे मोठे विधान उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे.
रत्नागिरी येथे आयोजित महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा स्पष्ट इशारा दिल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी कोकण हे निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. येथे उद्योग विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असला पाहिजे. प्रदूषण वाढवणारे प्रकल्प मंजूर करून कोकणच्या आरोग्यावर आणि शेती-मत्स्यव्यवसायावर परिणाम होणार असेल, तर सरकार ते सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले आहे

लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून चिपळूण, खेड, लोटे परिसरात तीव्र विरोध सुरू होता. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले होते. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, केवळ आश्वासन नको तर ठोस निर्णय हवा. कोकणातील पर्यावरण टिकवण्यासाठी प्रदूषणकारी प्रकल्पांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

कोकणासाठी निर्णायक भूमिका?
उद्योगमंत्री उदय सामंत
यांच्या या घोषणेमुळे महायुती सरकार कोकणातील पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. मात्र या विधानानंतर प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाई लवकरात लवकर झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
या वेळी गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत.भाजपचे नेते दिपक पटवर्धन. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे जिल्हा प्रमुख राहुल पंडित.बंड्या साळवी व महायुतीचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील मतदार आणि खास करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here