रत्नागिरीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 6 फेब्रुवारी रोजी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी

रत्नागिरी,  : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान केंद्र असणा-या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पंचायत समिती हद्दीतील शाळेतील मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी पोहोचणार आहेत. त्यामुळे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान केंद्र असणा-या पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर क्षेत्रातील शाळांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या नऊ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक क्षेत्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Breaking News

श्री क्षेत्र परशुराम येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची विकासकामांचा आढावा बैठक

श्री क्षेत्र परशुराम येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची विकासकामांचा...