सामाजिकनाणेकरवाडी, चाकण, पुणे येथे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती

नाणेकरवाडी, चाकण, पुणे येथे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती

सुविधेच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गणेश निबे हे सध्या डिफेन्स क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहेत आणि भविष्यात जागतिक स्तरावरही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला. त्यांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य दिले जाईल. मराठी उद्योजक म्हणून निबे कंपनीला ताकद देण्याची जबाबदारी आपली आहे, असेही यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.

या प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार श्री. महेश लांडगे, श्री. गणेश निबे, तसेच अनेक मान्यवर, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News