रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील पवित्र ‘कवी केशवसुत स्मारकात’ एक ऐतिहासिक सोहळा पार...

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील पवित्र ‘कवी केशवसुत स्मारकात’ एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील पवित्र ‘कवी केशवसुत स्मारकात’ एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.कृषीभूषण तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी (चिपळूण) व महाराष्ट्र सरकार मराठी भाषा विभाग यांच्या वतीने आयोजित आगामी ‘ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलना’च्या अधिकृत बोधचिन्हाचे (Logo) अनावरण नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक मराठी कवितेच्या जनकाच्या भूमीत हा अनावरण सोहळा होणे, हा एक विलक्षण योगायोग आहे.
येत्या १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी हे भव्य संमेलन पार पडणार आहे. शेती, सहकार आणि साहित्य या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांना एकाच व्यासपीठावर आणून ग्रामीण विकासाची नवी दिशा निश्चित करण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. कृषी संस्कृतीचा वारसा शब्दांच्या माध्यमातून जपण्यासाठी हे संमेलन एक मैलाचा दगड ठरेल.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आयोजकांना नगराध्यक्ष म्हणून शिल्पा सुर्वे यांनी मनापासून शुभेच्छा देत अभिनंदन केले

यावेळी कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे,श्री.प्रकाश देशपांडे,सौ.श्वेता खेवूर, कोंकण मराठी साहित्य परिषद व मराठी साहित्य परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,सदस्य,साहित्य प्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Breaking News