कोकणातील आदर्शवत काम करणाऱ्या जनसेवकांचा सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवला, नाशिक येथे अनुगामी लोकराज्य अभियान यांच्या वतीने आयोजित कापसे फाऊंडेशन येथे ‘अनुलोम संगम-२०२६’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी समर्पणाची भावना अत्यंत महत्त्वाची असून, अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून कार्य करत आहेत, ही बाब प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांनुसार समाजातील अडचणी दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून प्रभावीपणे होताना दिसत आहे. चांगली समाजनिर्मिती हीच या कार्यामागील प्रेरणा आहे.
अनुलोमने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व घडवण्याचे कार्य हाती घेतले असून, प्रगतिशील आणि समरस समाज उभारण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून भेदभावरहित, एकजूट समाजनिर्मितीचे कार्य सुरू असून संवादिनी उपक्रमाद्वारे यामध्ये 500 महिला स्वयंसेवक सहभागी झाल्या आहेत, हे समरसतेचेच उदाहरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
समाजात अनुलोमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हा परिवार अधिक व्यापक व्हावा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अनुलोमचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमा दरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कोकण विभागातील
भिवंडी उपविभागतील मुरबाड भाग जनसेवक दिनेश भावार्थे, भिवंडी पश्चिम भाग जनसेवक राजेश पाठारे, कुडाळ भाग जनसेवक बाजीराव काळे तसेच भिवंडी उपविभाग जनसेवक प्रकाश लसणे व रत्नागिरी सिंधुदुर्ग उपविभाग जनसेविका तनया शिवलकर या जनसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सांघिक उत्तम कामगिरी (टीम वर्क) म्हणून कोकण विभागातील भिवंडी उपविभागातील सर्व जनसेवक यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अनुलोम प्रांतप्रमुख स्वानंद ओक, सहप्रमुख सुजाता मराठे, अतुल वझे, कोकण विभाग पालक प्रेरणा पवार, कोकण विभाग प्रमुख रवींद्र भोवड व महाराष्ट्रातील सर्व जनसेवक व संवादिनी उपस्थित होते.
